अहमदाबाद 07 जानेवारी 2025 – तीन दशके उत्कृष्टता आणि विश्वासाची परंपरा जोपासणाऱ्या टेक्सटाइल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडने आपल्या शेअरधारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत, कंपनीने 4:1 या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर वाटपास मंजुरी दिली असून, कंपनीच्या प्रगतीतीसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या योजनेनुसार, शेअरधारकांना त्यांच्या प्रत्येक 1 (एक) पूर्णतः भरलेल्या ₹1/- दर्शनी मूल्याच्या शेअरच्या बदल्यात 4 (चार) नवीन पूर्णतः भरलेले ₹1/- दर्शनी मूल्याचे शेअर्स मिळणार आहेत. यासाठी कंपनीच्या फ्री रिझर्व्ह किंवा सिक्युरिटी प्रीमियम अकाउंटचा वापर केला जाणार आहे. यासाठीची रेकॉर्ड तारीख लवकरच जाहीर केली जाईल. या निर्णयामधील उद्देश म्हणजे कंपनीच्या शेअरधारकांना त्यांच्या बाजारातील शेअरची किंमत वाढवणे आणि उत्तम परतावा मिळवून देणे हा आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडने घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीच्या आर्थिक मजबुती आणि विश्वास दिसून येतो.
या बोनस शेअर वाटपामुळे प्रत्येक ₹1/- दर्शनी मूल्याच्या सध्याच्या शेअरच्या बदल्यात 4 नवीन शेअर्स दिले जातील, ज्यामुळे शेअरधारकांना दीर्घकालीन लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड आपल्या भागधारकांच्या विश्वासाला नेहमीच महत्त्व देते आणि हा निर्णय कंपनीच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.